
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पोलीस ठाण्यात (Police station) भांडणाची तक्रार नोंदविल्याच्या कारणातून एका तडीपार गुन्हेगाराने महिलेचा विनयभंग (molestation) केल्याची घटना वडाळागाव येथे घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी (police) दिलेली माहिती अशी, की पीडित महिलेच्या घरात आरोपी तडीपार वसिम ऊर्फ चिया लतीफ शहा, त्याची भावजय शाहीन मोहसीन शहा (Mohsin Shah) व त्याची बहीण सना मर्द मोईन शहा या तिघांनी संगनमत करून अनधिकृतपणे प्रवेश केला.
दरम्यान, पीडित महिलेने पोलीस ठाण्यात भांडणाची तक्रार दिल्याच्या कारणावरून या तिघा आरोपींनी संगनमत करून पीडित महिला व तिची मुलगी हिला अश्लील शिवीगाळ केली, तसेच चिया शहा याने हातातील लाकडी दांड्याने महिलेला मारून दुखापत केली, तसेच तिच्याशी अंगलट करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केला.
तसेच पीडित महिला व तिच्या मदतीला धावून आलेल्या सत्यभामा देवरे, रवी खाडे व प्रकाश बेंडकुळे यांनाही तिघा संशयितांनी मारहाण (beating) करून दमदाटी केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वसिम (Indiranagar Police Station) ऊर्फ चिया, शाहीन शहा व सना शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.