Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशRSS सह मोहन भागवतांच्या ‘डीपी’वर अखेर तिरंगा

RSS सह मोहन भागवतांच्या ‘डीपी’वर अखेर तिरंगा

दिल्ली | Delhi

‘हर घर तिरंगा’ अभियानाला (Har Ghar Tiranga Abhiyan) आजपासून सुरूवात झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav) मोदी सरकारकडून (Modi Govt) हे अभियान राबवलं जात आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यानिमित्त देशवासियांना आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंग्याचा डीपी लावण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, या मोहिमेची घोषणा झाल्यापासूनच अनेक जण एकच प्रश्न विचारत होते. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) तिरंग्याचा फोटो डीपीला कधी ठेवणार?. अखेर १२ ऑगस्टला संघाच्या आणि सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलून तिरंगा ठेवण्यात आला.

विरोधकांची टीका

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने देशपातळीवर ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात आले आहे. मात्र भाजपाच्या वतीने हे अभियान राबवून देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर भगवा ध्वजच ठेवण्यात आला होता. यावरून विरोधकांनी संघावर जोरदार टीका केली होती.

आता आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रोफाईलचा फोटो बदलून संघाने विरोधकांना उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. एवढंच नव्हे तर प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रीय स्वाभिमान जागृत करण्याचा संदेश मोहन भागवत यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या