मोदींचा कार्यकाळ म्हणजे रामराज्याचीच सुरुवात

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे मत
मोदींचा कार्यकाळ म्हणजे रामराज्याचीच सुरुवात

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

सन 2014 पासून केंद्रात मोदी सरकारने (Modi government) कामकाजाला सुरूवात केली. प्रत्येक योजना (Plan) शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यात केंद्र सरकारला यश (Success) मिळाले आहे. मोदींचा कार्यकाळ (Modi's tenure) ही रामराज्याचीच सुरूवात (beginning of Ram Rajya) असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (Union Minister of State for Health) डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

जळगावातील चिमुकले श्रीराम मंदिरात (Chimukle Shriram Temple) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी श्रीराम जन्मोत्सवात (Shri Ram Janmotsava) सहभागी होऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या की, 107 वर्षे जुन्या असलेल्या या चिमुकले श्रीराम मंदिरात (Shriram Temple) प्रभु श्रीराम जन्मोत्सव सोहळा अनुभवता आला हे माझे भाग्यच आहे. आजच्या उत्सवातुन एक नवी ऊर्जा (New energy) आणि शक्ती मिळाली आहे. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जशी सुरूवात केली ती रामराज्याच्याचदृष्टीने (beginning of Ram Rajya) सुरू आहे. आरोग्य, शिक्षणाच्या व्यवस्था वाढविण्यात केंद्र सरकारला यश मिळाले आहे. अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिर साकारण्याचे मोठे काम सुरू आहे. या माध्यमातून मोदी सरकारकडुन श्रीरामाचीच सेवा घडत असल्याचेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.