
आयपीएलमध्ये (IPL) मोठा घोटाळा करुन फरार माजी चेअरमन ललित मोदी (Modi) याची प्रकृती बिघडली असून त्याला चोवीस तास ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.
ललित मोदीची गर्लफ्रेन्ड सुश्मिता सेन हीच्या भावानं त्याच्या आरोग्याबाबत अपडेट दिली आहे. जुलै २०२२ मध्ये ललित मोदीनं सुश्मिता सेनसोबतच्या आपल्या नात्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यांचे एकत्र असलेले अनेक फोटो त्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट देखील केले होते. यामध्ये त्यानं सुश्मिताचा उल्लेख बेटर हाफ असा केला होता. यानंतर त्यानं आपला प्रोफाईल फोटो देखील बदलला होता.
मोदीला कोविडचा संसर्ग झाला असून त्यातच त्याला ताप आणि न्युमोनिया देखील झाला आहे. ललित मोदीनं शुक्रवारी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. यामध्ये आपण मेक्सिकोमध्ये असल्याचं त्यानं सांगितलं होतं. त्याला इथं कोविडचं इन्फेक्शन झाल्यानं त्याला एअर अॅम्ब्युलन्सनं उपचारांसाठी लंडनला आणण्यात आलं आहे. त्याला गेल्या दोन आठवड्यात दोन वेळा कोरोनाचा संसर्ग झाला त्यातच ताप आणि गंभीर न्युमोनियाची देखील लागण झाली.