मोदी सरकारचे शेतकऱ्यांना गिफ्ट; 'या' पिकांचा ‘एमएसपी’ वाढला

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली । New Delhi

केंद्र सरकारने (Central Government) देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना (farmers) मोठा दिलासा देत १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या या निर्णयांची माहिती दिली...

यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले की, गेल्या ८ वर्षांत बियाण्यांच्या बाजारीकरणाचा (Marketing) फायदा झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न (income) वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. आजच्या बैठकीत १४ खरीप पिकांसाठी एमएसपी (MSP) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या वर्षी ५० टक्के अधिक खर्चाचा निर्णय आम्ही सातत्याने पुढे नेला आहे. किसान सन्मान निधी (Kisan Sanman Nidhi) अंतर्गत २ लाख कोटी रुपये खात्यात गेले आहेत. तसेच खतावर २ लाख १० हजार कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. याचबरोबर कृषी अर्थसंकल्प (Agricultural budget) देखील १ लाख २६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

ठाकूर पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने इतरही अनेक पिकांना एमएसपीच्या कक्षेत आणले आहे. विम्यापासून सिंचनापर्यंत (Irrigation) प्रत्येक टप्प्यावर सक्षमीकरण (Empowerment) झाले आहे. कृषी क्षेत्रात अनेक पावले उचलली गेली आहेत.

पीक विविधतेला प्रोत्साहन देताना सरकारने एमएसपीच्या दरात ऐतिहासिक वाढ केली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि त्यांची विक्रीही वाढली. गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारच्या (Modi government) निर्णयांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. यासोबतच शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.” असेही अननुराग ठाकूर म्हणाले आहेत.

या पिकांवर वाढवला एमएसपी

भात (सामान्य), भात (ए ग्रेड), ज्वारी (हायब्रीड), ज्वारी (मालदांडी), बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल बियाणे, सोयाबीन, तीळ, रामतीळ, कापूस (मध्यम फायबर), कापूस (लांब फायबर) वर एमएसपी वाढवली आहे.

एमएसपी म्हणजे काय?

किमान आधारभूत किंमत ही किमान किंमत आहे ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. सरकार शेतकऱ्याला त्याच्याकडून खरेदी केलेल्या पिकावर जे पैसे देते ते एमएसपी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com