
नवी दिल्ली । New Delhi
रोजगाराच्या (Employment) मुद्द्यावर अनेकदा प्रश्नांना सामोरे जाणारे मोदी सरकार (Modi government) आता या संकटावर मात करण्यासाठी योजना तयार करत आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून ( Prime Minister's Office) एक ट्विट करण्यात आले आहे...
या ट्विटनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील कर्मचाऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेतला आणि पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये १० लाख कर्मचाऱ्यांची भरती (Recruitment) सरकारकडून करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्णयामुळे देशातील लक्षावधी बेरोजगार युवकांना (Unemployed youth) मोठी संधी (Opportunity) उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी एप्रिल महिन्यातही संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी, नोकरी देण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच, सरकारमधील रिक्त जागांवर लवकरात लवकर पदांची भरती करावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
दरम्यान, नोटाबंदी (Denomination) जीएसटी (GST) आणि नंतर करोना (Corona) या काळात अर्थव्यवस्थेचा (Economy) विकास दर मंदावल्यामुळे खासगी क्षेत्रातील (Private Sector) नोकऱ्यांच्या संधी फारशा आलेल्या नाहीत. त्यातच, वाढत्या महागाईने (Inflation) त्रस्त झालेल्या लोकांकडून केंद्र सरकारवर टिका करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने केलेली ही घोषणा सरकारी नोकरीच्या (Government jobs) शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.