केंद्र करणार हा बदल : मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघणार

केंद्र करणार हा बदल : मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली

मराठा आरक्षणासाठीची (Maratha reservation) पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता केंद्र सरकार मोठा निर्णय घेत आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) निकालानंतर 102व्या घटनादुरुस्ती विधेयकात केंद्र सरकार बदल करणार आहे. नव्या बदलांना आजच्या केंद्रीय कॅबिनेटच्या (central cabinet) बैठकीत मंजुरी मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या (supreme court)निकालात 102 व्या घटना दुरुस्तीनंतर एसीईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारलाच आहे, असे म्हटले आहे. विधेयकात बदल करून केंद्र हा अधिकार आता राज्य सरकारांना ही देणार आहे. यामुळे मराठा आरक्षणावर राज्याला निर्णय घेता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
Tokyo Olympics : लवलिनाचा पराभव आता कास्यपदक मिळणार

मराठा आरक्षणाबाबत दाखल केलेली मोदी सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने (supreme court)1 जुलैला फेटाळली होती. राज्य सरकारनेही सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली. मोदी सरकारची (modi government)याचिका फेटाळली गेल्यामुळे राज्य सरकारनं त्याच विषयाबाबत दाखल केलेली याचिका निकालात निघाली आहे.

काय आहे 102 व्या घटनादुरुस्ती

102 व्या घटनादुरुस्तीनंतर एखाद्या राज्याला एखादी जात मागास ठरवण्याचा अधिकार राहिलेला नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचने मराठा आरक्षणाचा निकाल देताना सांगितलं होतं. हा अधिकार आता फक्त राष्ट्रपती, संसद यांच्याकडेच असल्याचंही सुप्रीम कोर्टानं निकालात स्पष्ट केलं. पण आता केंद्र सरकार राज्यांना अधिकार बहाल करुन, त्या त्या स्तरावर निर्णय घेण्याचे हक्क देत आहे. त्यासाठी 102 व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com