Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशMSP वाढवली : जाणून घ्या, कशाला काय किंमत

MSP वाढवली : जाणून घ्या, कशाला काय किंमत

नवी दिल्ली

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला देशभर विरोध होत असतांनाच केंद्रातल्या मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

गव्हाच्या आधारभूत किमतीत 50 रुपयांनी तर हरबराच्या किमतीत 225 रुपयांनी वाढ केली आहे.रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली. मुख्य 6 पिकांमध्ये ही वाढ आहे. गहू, मोहरी, हरबरा, करडई यासह 6 पिकांच्या किंमतींमध्ये ही वाढ होणार आहे. 50 ते 300 रुपयांची ही वाढ आहे.

कृषी मुल्य आयोगाने (Commission for Agricultural Costs and Prices) केलेल्या शिफारशींनुसार मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

माल जुनी किंमत नवीन किंमत फरक

गहू 1925 1975 50

जौ 1525 1600 75

मोहरी 4425 4650 225

चना 4875 5100 225

सुर्यफुल 5215 5327 112

मसूर 4800 5100 300

- Advertisment -

ताज्या बातम्या