Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशगहू, हरभरा, मसूर, सूर्यफूलच्या आधारभूत किंमतीत वाढ

गहू, हरभरा, मसूर, सूर्यफूलच्या आधारभूत किंमतीत वाढ

नवी दिल्ली

केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे. यात गहू, हरभरा, मसूर, सूर्यफूलांच्या किंमतीत वाढ केली. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

गव्हाची किमान आधारभूत किंमत (MSP) ४० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटर २ हजार १५ रुपये इतकी केली आहे. मोहरीच्या किमान आधारभूत किंमत (MSP) मध्ये ४०० रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. यामुळे मोहरीची MSP ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे. वनस्पती तेलाच्या उत्पादनात वाढीसाठी यामुळे मदत होणार आहे.

हरभरा आणि मसूरच्या किमान आधारभूत किंमत (MSP) मध्ये मोठी वाढ झाली आहे. हरभऱ्याच्या दरात प्रति क्विंटल १३० रुपये तर मसूरच्या दरात ४०० रुपये वाढ केली आहे. यामुळे हरभऱ्याची एमएसपी ५ हजार २३० रुपये तर मसूरची MSP ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या