मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

चारचाकी एक्सयुव्ही (SUV Car) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वर्ध्याजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू (Medical Studen) झाला आहे. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे.

मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत
कार पुलावरुन कोसळली, आमदारपुत्रासह सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

अपघातातील मृतांमध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचाही समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सेलसुराजवळ झालेल्या अपघातामधील जीवितहानीमुळे मला दुःख झालं असून ज्यांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले त्यांच्यासोबत मी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करता, असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

मदतीची घोषणा

वर्ध्यातील सेलसुरा गावाजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये मदत PMNRF मधून देण्यात येणार आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

मृतांची नावे -

निरज चौहान (वय 22, रा. गोरखपुर, उ. प्रदेश),

अविष्कार विजय रहागडाले (वय 21 रा. गोंदिया),

नितेशसिंग (वय 25, रा. ओडिशा)

विवेक नंदन (वय 23 रा. गया, बिहार)

प्रत्युशसिंह हरेन्द्रसिंह (वय 23 रा. गोरखपुर, उ.प्रदेश),

शुभम जयस्वाल (वय 23 रा. दिनदयाल उपाध्याथ नगर, उ,.प्रदेश),

पवनशक्ती (वय 19, रा.गया बिहार) यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com