Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशहरात बसवणार आधूनिक पाणी मीटर

शहरात बसवणार आधूनिक पाणी मीटर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वतीने करण्यात येणार्‍या पाणीपुरवठ्यात (water supply) सुसूत्रता आणण्याबरोबरच

- Advertisement -

पाण्याची गळती व अपव्यय रोखण्यासाठी स्मार्ट सिटीकडून (Smart City) महानगरपालिकेच्या समन्वयाने शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुमारे साडेसात स्मार्ट पाणी मीटर (Smart water meter) बसविण्यात येणार आहेत.

या माध्यमातून पाण्याचे ऑडीट (Water audit) करणे सोपे जाणार आहे. महानगर पालिकेत सूरू असलेल्या मॅन्युअल मीटर रीडिंग (Manual meter reading) पद्धतीला कमी करणे, मीटर रीडिंगमधील विसंगती दूर करणे, पाण्याच्या बिलिंगची (water bills) कार्यक्षमता वाढवणे, पाण्याच्या वापरासंबंधी नियोजनात पारदर्शकता आणणे हा यामागचा उद्देश आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर व्यावसायिक व अनिवासी ग्राहक यांच्यासाठी (लो रेंज वाइड एरिया नेटवर्क) स्मार्ट वॉटर मीटर बसवण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शहरात प्रायोगिक तत्वावर सुमारे 7,447 स्मार्ट वॉटर मीटर (Smart water meter) येत्या तीन ते सहा महिन्यांमध्ये बसवण्यात येणार आहेत. शहरात केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनच्या (Smart City Mission) अनुषंगाने हा उपक्रम राबविणार असून, त्यात वाढत्या पाण्याच्या मागणीची पूर्तता करण्याबरोबरच भविष्यातील संभाव्य पाण्याच्या संकटाशी सामना करण्यासाठी रहिवाशांना सतत पाणीपुरवठा करता येईल, याची खात्री करण्यासाठी पाणी वितरण प्रकल्प सुरू केला आहे.

नाशिक शहराला जलसंवर्धनाच्या दृष्टीने शाश्वत आणि स्वयंपूर्ण शहर बनविण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल.- सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी.

- Advertisment -

ताज्या बातम्या