Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासंयमी, ऊर्जावान युवा नेता अमित ठाकरे

संयमी, ऊर्जावान युवा नेता अमित ठाकरे

नाशिक | फारुक पठाण | Nashik

महाराष्ट्र निर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray, Chief of the Maharashtra Navnirman Sena) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) मागील काही वर्षांपासून पक्षात कमालीचे क्रियाशील झाले आहेत.

- Advertisement -

युवा पिढीतील नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असले तरी संयम आणि ऊर्जा (patience and energy) असणारा युवा नेता, अशी त्यांची ओळख निर्माण होत आहे.पक्ष संघटनेतील तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारा हा नेता आहे. प्रसंगी मैदानात उतरून कधी क्रिकेट तर कधी फुटबॉल खेळून संघटनेत जोश भरण्याची कला त्यांच्यात आहे. सध्या त्यांच्या जाहीर सभा झाल्या नसल्या तरी ते अभ्यासपूर्ण नेता असल्याचेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अमित सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.

राज्यातील मोठ्या नेत्यांची दुसरी फळी सध्या राजकारणात (politics) सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे, डॉ. सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे, सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे आदी युवा नेत्यांची नावे चर्चेत आहेत. आदित्य ठाकरे आमदार होऊन मंत्रीदेखील झाले. सुजय विखे खासदार आहेत. सत्यजित तांबेदेखील आमदार झाले आहेत. प्रणिती शिंदेही आमदार आहेत. मनसेनाप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी पक्ष संघटनेत काम करायला पसंती दिली आहे.

खरे तर ठाकरे घराण्यातील लोकांनी निवडणुकीच्या (election) राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले होते. मात्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढली तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने त्यांना विधान परिषदेत जावे लागले होते. मनसेना पक्ष हा तसा राज ठाकरे यांचे नेतृत्व आणि वक्तृत्वाच्या जोरावर चालणारा पक्ष आहे. अशा वेळेला अमित यांनी पक्ष संघटनेत आपल्या कलागुणांनी वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.

राज ठाकरे पुत्र म्हणून त्यांची क्रेझ महाराष्ट्रात असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करतात. उच्चशिक्षित अमित चांगले खेळाडू आहेत. ते चांगले क्रिकेट खेळतात. फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ आहे. बॅडमिंटनमध्येदेखील ते चॅम्पियन आहेत. नव्या पिढीला अशा हरहुन्नरी नेत्याचे अनुकरण करणे आवडते. मागील काही काळात अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या महाराष्ट्रभर दौरे झाले. त्यांच्या सर्व दौऱ्यांना कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे

संयम हा अमित यांचा प्रमुख गुण आहे. नाशिकमध्ये शाखाप्रमुखांच्या नियुक्तीसाठी ते नाशिकला आले होते. 122 शाखाप्रमुखांची नेमणूक करायची होती. यासाठी अमित यांनी तब्बल साडेसातशे कार्यकर्त्यांच्या मुलाखती पक्षाच्या राजगड कार्यालयात घेतलया. सुमारे आठ तास ते पक्ष कार्यालयात बसून होते. प्रत्येकाशी त्यांनी चर्चा करून शाखाप्रमुखांची नेमणूक केली होती. संयम आणि ऊर्जा असली तरी अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबतच लोकांमध्ये जावे लागेल. आपल्या नेतृत्वाची छाप पाडावी लागेल. त्यांच्या नेतृत्वाचा खरा कस येथे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या