Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिपतर्फे मॉडेल G-20 शिखर परिषदेचे आयोजन

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिपतर्फे मॉडेल G-20 शिखर परिषदेचे आयोजन

नाशिक | Nashik

भारताने डिसेंबरमध्ये जी-२० चे (G-20) अध्यक्षपद स्वीकारले असून हे अध्यक्षपद साजरे करण्यासाठी आणि जी – २० हे सत्तेचे कॉरिडॉर मर्यादित तरुणांपर्यंत नेण्यासाठी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या (Rambhau Mhalgi Prabodhini) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशीपतर्फे (Indian Institute of Democratic Leadership) भारतातील पहिल्या मॉडेल जी २० चे आयोजन करण्यात येणार आहे…

- Advertisement -

मॉडेल जी – २० शिखर परिषद (Model G-20 Summit)३० व ३१ जानेवारी २०२३ रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तन कॅम्पसमध्ये आयोजित केली जाणार आहे. तर भारताचे जी-२० शेर्पा हे अमिताभ कांत मॉडेल जी २० शिखर परिषदेचे उद्घाटन करणार असून आयसीसीआरचे अध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे (Dr. Vinay Sahasrabuddhe) उद्घाटनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमात देशभरातून एकूण १५० तरुण सहभागी होणार असून मॉडेल जी-२०चे संचालक देवेंद्र पै यांनी सांगितले की, ‘भारताच्या प्रतिष्ठित जी२० चे अध्यक्षपद भूषवणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप शिष्टमंडळाने भारताचे पहिले मॉडेल जी-२०चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे याचा आम्हाला आनंद आहे.’ अशी माहिती मॉडेल जी-२०च्या आयोजन समितीचे सदस्य अभिषेक नागरे (Abhishek Nagre) यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या