महापालिकांवर मनसे सत्तेत येणारच- राज ठाकरे

महापालिकांवर मनसे सत्तेत येणारच- राज ठाकरे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मनसेच्या भव्य अशा १७ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलतील? याकडे अनेकांचं लक्ष होतं. त्यात राज ठाकरे यांनी पक्षाच्या आतापर्यंतच्या जडणघडणावर प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे यांनी मनसेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाजप विषयी मोठं वक्तव्य केलं. भारतीय जनता पक्षानेही लक्षात घेतलं पाहिजे, आज भरती चालू आहे, ओहटी येणार. ओहटी येऊ शकते. नैसर्गिक आहे ती गोष्ट, ती कोणी थांबवू शकत नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय.

दरम्यान मनसे पक्ष महापालिकांवर सत्तेत येणारच याची ग्वाही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिली. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना देखील इशारा दिला आहे.

नाशिकमध्ये एवढं काम केलं, लोकांना नेमकं काय हवंय? नाशिक मध्ये जेवढं काम झालं तेवढं 25 वर्षात काम झालं नाही. 5 वर्षात कोणावरही भ्रष्टाचार चा आरोप झाला नाही. आता नाशिकमधले काही जण हळहळतायत, पण निवडणुकीवेळी हळहळतील का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

22 तारखेला गुढीपाडव्यानिमित्त मनसेची सभा होणार आहे, या सभेमध्ये मशिदींवरच्या भोंग्याबाबत बोलणार आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com