Video : नाशकात मनसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे; अनेक कार्यकर्ते ताब्यात

Video : नाशकात मनसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे; अनेक कार्यकर्ते ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्यामुळे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण करण्याकरिता तयारी केली. मात्र पोलिसांनी रात्री पासून मनसेना पदाधिकाऱ्यांची धडपकड सत्र सुरु केली आहे...

इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेल मध्ये पोलिसांनी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अचानक धाड मारत सुमारे १४ मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी स्पिकर व लाऊडस्पिकर जप्त करत कारवाई केली.

तर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिघांना नाशिकच्या हद्दीतुन ८ मे पर्यंत हद्दपार करण्यात आले होते ते देखील सदर हॉटेलमध्ये आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरीकडे सातपूर परिसरातील विभाग अध्यक्ष योगेश बंटी लभडे यांच्यासह चार महिंद्रा सर्कलला भोंगे लावणार त्याच वेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले.

भद्रकाली पोलीस ठाण्यात सहा महिला ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या परिसरात हनुमान चालीसा लावण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये माजी नगरसेविका सुजाता डेरे यांच्यासह आकांक्षा गोडसे आदींसह चार महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

इंदिरानगर परिसरात सर्वाधिक १४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले हेत. अतिसंवेदनशील भाग असलेला अंबड लिंक रोडवर छावणीचे स्वरूप होते.

याठिकाणी सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख हे बंदोबस्तावर होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com