Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र : महाराष्ट्रासाठी केल्या या पाच मागण्या

राज ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र : महाराष्ट्रासाठी केल्या या पाच मागण्या

मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असून राज्यातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी मोदींसमोर राज्यासाठी पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यावेळी त्यांनी मोदींना सवालही विचारला आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंनी या पत्रात म्हटले आहे, “कोव्हिड-19 ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय लॉकडाऊन, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना टाळेबंदीसारखे पर्याय अवलंबले जात आहेत. ते आता राज्याला परवडणारे नाही. मात्र राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने पर्याय तरी काय उरतो?’ असे म्हणत राज ठाकरे यांनी कोरोना लसी आणि इतर सुविधा यांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे ५ मागण्या केल्या.

१) महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याची परवानगी द्यावी

२) सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी

३)राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी

४)लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हॉपकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी

५) राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी अशीही विनंती.

- Advertisment -

ताज्या बातम्या