राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांना सुनावले; म्हणाले, सध्या कोणीही उठतो अन्...

राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांना सुनावले; म्हणाले, सध्या कोणीही उठतो अन्...

पुणे | Pune

मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १८ व्या जागतिक मराठी संमेलनात (18th World Marathi Conference) व्यंग, वास्तव, राजकारण या विषयांवर प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी करत महापुरुषांच्या होणाऱ्या अपमानाबाबत राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे.

यावेळी ते म्हणाले की, सध्या कोणीही उठतो अन् इतिहासकार होतो, कोणीही काहीही बोलत आहे. राज्यातील राजकीय स्थिती एवढी लयाला गेली आहे. जातीजातीत तेढं निर्माण करण, महापुरूषांबद्दल बोलणं हे राजकारण नव्हे. राजकारण अगदी मुक्त असलं पाहिजे, दोन द्याव्या तर दोन घ्याव्या, असा सल्ला यावेळी राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांना दिला.

तसेच राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांबाबत पुढे बोलतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र (Maharashtra) हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टीकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर देशात एकाच राज्यावर जास्त लक्ष दिले जाते हे बरोबर नाही, अशी भूमिका मीच मांडली होती, त्यानंतर त्यावर सगळे शहामृगासारखे गोळा झाले, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, राज ठाकरेंनी त्यांच्या लाव रे तो व्हिडिओवर खुलासा करत म्हटले की, एखाद्या भूमिकेला विरोध करणे हे चुकीचं नाही. जर त्या व्यक्तीने चांगली गोष्ट केली तर त्यांचे अभिनंदन करावं इतका मनाचा मोठेपणाही तुमच्याकडे असावा लागतो. २०१४ नंतर देशात जे राजकीय स्थित्यंतर झालं त्यातल्या अनेक गोष्टी मला पटल्या नाहीत. त्यामुळेच 'लाव रे तो व्हिडीओ'ची भूमिका घेतली होती. मात्र, २०१९ नंतर राम मंदिर, काश्मीरमधील कलम ३७० अशा अनेक चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे अभिनंदनही मी केलं, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com