राज ठाकरेंनी युतीसाठी दोनदा पाऊल पुढं टाकलं, मात्र ठाकरेंकडून...; मनसे नेत्याची प्रतिक्रिया

राज ठाकरेंनी युतीसाठी दोनदा पाऊल पुढं टाकलं, मात्र ठाकरेंकडून...; मनसे नेत्याची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) गेल्या वर्षभरात घडलेल्या दोन मोठ्या घटनांनी अक्षरशः ढवळून निघाले. अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपच्या (BJP) मदतीने काही आमदारांच्या समर्थनासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्वीस्ट आला. दरम्यान या राजकीय भुकंपामुळे महाविकास आघाडीचे पुढे काय होणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात असतानाच आता तरी उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र यावे अशी साद मनसे कार्यकर्त्यांकडून घालण्यात आली. या दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी युतीसाठी दोनदा पाऊल पुढं टाकलं, मात्र ठाकरेंकडून...; मनसे नेत्याची प्रतिक्रिया
संजय राऊतांचा भाजपवर घणाघात; म्हणाले, "हे तर राजकारणातले सीरियल..."

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हंटले आहे की, मनसेने दोन वेळा उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, ठाकरे गटाने मनसेचा प्रस्ताव फेटाळला होता." तसेच, आम्ही हात पुढे केला होता मात्र ठाकरेंनी टाळी टाळली. लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, मात्र अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील, असेही संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान पुढे ते असे ही म्हणाले की, मला आदेश येतात तसं मी काम करतो. सध्या मला स्वबळाचा आदेश देण्यात आला आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. २०१४ किंवा २०१७ या दोन्ही वेळा राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्याकडून (Uddhav Thackeray Group) टाळाटाळ केली गेली. हो की नाही हे उत्तर पण दिले नाही आणि अचानक माघार घेतली, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले .

राज -उध्दव एकत्र यावे असे बॅनर

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडल्यानंतर, राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे अशा आशयाचे पोस्टर शिवसेना भवनाबाहेर लावण्यात आले होते. या बॅनरवर "महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला. राजसाहेब - उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे" अशी साग घालण्यात आली होती. दरम्यान या बॅनरमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा देखील जोरात सुरू आहेत. दरम्यान याबद्दल उद्धव ठाकरे काही भूमिका घेणार का याकडे देखील दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंनी युतीसाठी दोनदा पाऊल पुढं टाकलं, मात्र ठाकरेंकडून...; मनसे नेत्याची प्रतिक्रिया
पाच लाखांची खंडणी द्या, अन्यथा बॉम्बने दुकान उडवू; दुकानदाराला धमकावले

दरम्यान, काल झालेल्या मनसेच्या बैठकीतही मनसे पदाधिकाऱ्यांनी हाच रोख होता, तसेच याच आशयाचे बॅनर्सही झळकले होते. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत उध्दव ठाकरेंना साथ देऊ असे मनसे नेत्यांचे म्हणणे होते. दरम्यान, गेल्यावेळीच्या निवडणुकीत ही दोन्ही भावांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशीच मागणी होती. तेव्हा राज ठाकरेंनी हात ही पुढे केला होता मात्र उध्दव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र यावेळी मराठी माणसांची अस्मिता जपण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे अशी भावना जन सामान्यांसोबत कार्यकर्त्यांची ही असल्याने राज ठाकरेंना विनंती करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

राज ठाकरेंनी युतीसाठी दोनदा पाऊल पुढं टाकलं, मात्र ठाकरेंकडून...; मनसे नेत्याची प्रतिक्रिया
Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला, ५ जणांचा चिरडून मृत्यू
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com