...अखेर मनसेना जिल्हाध्यक्षांना अटक; 'इतक्या' दिवसांपासून होते फरार

भद्रकाली पोलिसांची कारवाई
...अखेर मनसेना जिल्हाध्यक्षांना अटक; 'इतक्या' दिवसांपासून होते फरार
Breaking News

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मनसेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपल्यानंतर मनसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर फरार असलेले जिल्हाध्यक्ष अंकुश पवार (MNS Ankush Pawar) यांना भद्रकाली पोलिसांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे सापळा रचत अटक केली....

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी तिन मे पर्यंत महाराष्ट्रातील सर्व मशिदीवरील भोंगे काढावे अन्यथा चार मे पासून मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावली जाईल असा अल्टीमेटम राज्य शासनाला दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चार तारखेच्या पहाटेच मनसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अटक सत्र सुरु केले होते. तेव्हापासून मनसेना जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष दिलीप दातीर हे फरार होते.

मात्र, दिलीप दातीर यांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ (Crime branch unit 2) च्या पथकाने पाथर्डी फाटा (Phathardi Phata) येथील एका हॉटेलवर अटक करत त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली. सहाय्यक आयुक्त सोहेल शेख यांनी दातीर यांची १८ मे पर्यंत तडीपारीची नोटीस काढली.

दरम्यान, मनसेना जिल्हाध्यक्ष अंकुश पवार (MNS leader Ankush Pawar) हे (दि. ३) पासून फरार होते. भद्रकाली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वपोनी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रणिता पवार, पोलीस नाईक बैरागी,विशाल काटे यांच्या पथकाने जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांचेसह अजित ठाकरे,आप्पा क्षिरसागर यांना त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथून अटक करत भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) आणले. दरम्यान अंकुश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.