Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रशिरसाट - चतुर्वेदी वादात मनसेची उडी, ट्विट करत संजय शिरसाटांवर केली टिका...

शिरसाट – चतुर्वेदी वादात मनसेची उडी, ट्विट करत संजय शिरसाटांवर केली टिका ; म्हणाले…

मुबंई | Mumbai

शिवसेना शिंदे (Shivsena) गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) यांच्यावर त्या सौंदर्यामुळे राजकारणात पुढे गेल्या असल्याची टिका केली होती. हे बोलत असताना शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. यामुळे दोन्ही गटातील आमदार आमने- सामने आल्याचे पहायला मिळत आहे.

- Advertisement -

दरम्यान, आता या प्रकरणात मनसेने (MNS Twitt) देखील उडी घेतली असून त्यांनी आमदार संजय शिरसाट यांना खडे बोल सुनावले आहे. मनसेने याबाबतचे एक ट्विट करत शिरसाट यांचे कान टोचले आहे. प्रबोधन ठाकरेंच्या विचारांची आठवण करुन देत मनसेने संजय शिरसाट यांच्यावर सडकून टिका केली आहे.

‘समृद्धी’वर पुन्हा एकदा काळाचा घाला! ग्रेडर मशिन कोसळून १७ जणांचा मृत्यू

महाशक्तीने मुकुट चढविलेलं हे ‘शिर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे!

प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “महिलांबद्दलचा जितका आदर मनात साठवीत जाल तितके शिवराय तुमच्यावर अधिक प्रसन्न होत जातील…” त्याच प्रबोधनकार ठाकरेंच्या सुपुत्राचे म्हणजेच स्व. बाळासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करायचं आणि महाशक्ती पाठीशी आहे म्हणून महिलांबद्दलची वाट्टेल ती विधाने करायची हे महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही… अशांचे ‘शीर’ नेत्यांनी जाग्यावर आणावे अन्यथा ते ‘शीर’ विकृत विचारांचे ‘माठ’ आहे असे महाराष्ट्रात प्रचलित होईल.

काय म्हणाले होते शिरसाट

दरम्यान, चारित्र्यहीनतेच्या गप्पा प्रियंका चर्तुर्वेदींनी मारु नयेत. कृपया तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, जर आम्ही चारित्र्य काढायला बसलो ना तर बात लंबी चलेगी, अशा शब्दांत शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर टीका केली होती.. सर्वकाही माझ्या तोंडी मारायचे आणि मी अश्लील बोलतो मी चारित्र्यहिनासारखे बोललो, असे म्हणत टार्गेट करायचे. खैरेंना विचारा ते बोलले की नाही? त्यांच्याकडे ऑडिओ क्लीप आहे, अशा शब्दांत शिरसाट यांनी चतुर्वेदींना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता वाद पेटणारची शक्यता दिसते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या