Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यारत्नागिरीत राज ठाकरेंची तोफ धडाडणार; निशाण्यावर कोण?

रत्नागिरीत राज ठाकरेंची तोफ धडाडणार; निशाण्यावर कोण?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज रत्नागिरीत (Ratnagiri) जाहीर सभा होणार आहे. या सभेतून राज ठाकरे कुणावर टीका करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून टीझर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाचा रोख कुणाकडे असेल? याबाबत चर्चांना उधाण आले आहे…

- Advertisement -

वैतरणा धरणात बुडून एकाचा मृत्यू

एकीकडे बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) राजकारण चांगलेच तापलेले असतानाच ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी उध्दव ठाकरे बारसूमध्ये पोहोचले आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आज ६ मे रोजी कोकण दौऱ्यावर असून एकाच वेळी कोकणात दोन ठाकरी तोफा धडाडतांना दिसणार आहे.

राज ठाकरे यांची आज रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे जाहीर सभा होणार असून सभेसाठी ठाकरे कालच रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत. तसेच या सभेआधी मनसेने टीझर देखील प्रदर्शित केला असून तो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; कुटुंबातील चार जणांसह एकाचा मृत्यू

दरम्यान, टीझरमध्ये मनसेने सध्याच्या राजकारणात वापरल्या जाणाऱ्या विविध शब्दांचा वापर केला आहे. यामध्ये “आरोप-प्रत्यारोप, शिव्या-शाप, सूडभावना, राजकीय चिखल, खोके, उठाव, नाराजीनामा, राजीनामा,फोडाफोडी, गद्दारी, गलिच्छ भाषा आणि बंड” अशा सूचक शब्दांचा समावेश आहे. तसेच टीझरमध्ये पुढे राज ठाकरेंच्या आवाजात “सगळेचजण आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू…” असा संदेश देण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या