Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा युपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद ; म्हणाले, तुमच्या मनातून...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा युपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद ; म्हणाले, तुमच्या मनातून…

मुंबई | Mumbai

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा (Raj Thackeray Meets UPSC Students) अर्थात यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील गुणवंतांशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी संवाद साधला. राज ठाकरे यांच्या हस्ते या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली.

- Advertisement -

यूपीएससी परिक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा (UPSC Students) त्यांनी कौतुक सोहळा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी आपल्या राज्याविषयी मनात प्रेम, आदर कायम ठेवा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हा सत्कार झाला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, तुम्हाला लोकशाहीची ताकद आता कळली असेल. ज्याला दहावीला ४२ टक्के गुण पडलेला आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार करत आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर चांगलाच हशा पिकला.

“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांची…”; पंतप्रधान मोदींनी केले मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मंत्रालयातील एक किस्सा सांगितला. “एकदा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एक आयएएस अधिकारी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होते. तिथे सर्व जमले, पत्रकार देखील जमले. त्या अधिकाऱ्याला विचारले तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिव्या का घालत आहात. त्यावर तो अधिकारी म्हणाला असूदेत मी पर्मनंट आहे, ते टेम्पररी आहे. तुम्ही तुमची ताकद ओळखा”, असा आत्मविश्वास राज ठाकरे यांनी भावी अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी यावेळी आणखी एक किस्सा सांगितला, “तुमच्या मनातून महाराष्ट्र जाता कामा नये. मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, तेव्हाची गोष्ट. बीएमडब्ल्यूचा कारखाना महाराष्ट्रात येणार होता. विलासराव देशमुखांना वेळ नव्हता. त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बीएमडब्ल्यूचे डेलिगेशन येत आहेत. हा कारखाना आपल्याकडे आला पाहिजे, त्यामुळे त्यांच्याशी बोलून घ्या. ते दाक्षिणात्य अधिकारी होते.

गुजरातमध्ये पावसाचे थैमान ; पाण्याच्या प्रवाहात गाड्यांसह, जनावरे वाहून गेली

विलासराव गेल्यानंतर डेलिगेशन आले. बसल्यापासूनच महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी नन्नाचा पाढा सुरू केला. जागा हस्तांतरित करण्याला वेळ लागेल इथपासून ते वीजपुरवठा करता येणार नाही, टॅक्सेस वगैरे. त्यांना इतकं निराश केले की बीएमडब्ल्यूचे अधिकारी उठले आणि निघाले. व्हिजिटिंग कार्डांची अदला बदल झाली होती.

त्या आयएएस अधिकाऱ्याने तमिळनाडूतील त्याच्या सहकार्याला फोन लावला आणि सांगितले की इथून आताच बीएमडब्ल्यूचे लोक निघून गेले आहेत. हे त्यांचे नंबर्स आहेत. आता त्यांना संपर्क साधून त्यांना बोलावून घ्या. आणि बीएमडब्लूचा कारखाना तमिळनाडूत गेला.”

तत्पूर्वी राज ठाकरे यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या गुणवंतांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तुम्ही महाराष्ट्र्राबद्दलची आपुलकी कायम ठेवली पाहिजेत, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आपल्या राज्याबद्दल प्रेम असू शकते, तर तुम्हाला तर असलेच पाहिजे.

“मणिपूरवर देश जागा झालाय, अण्णांनी आता…”; संजय राऊतांचा खोचक टोला

त्यांना वाटते ना बऱ्याच गोष्टी आपल्या गुजरातमध्ये आल्या पाहिजेत, तसे वाटणे साहजिक आहे. प्रत्येकाच्या मनात आपल्या राज्याबद्दल प्रेम असते, तुमच्या मनातही आपल्या राज्याविषयी ठासून असले पाहिजे. तुम्ही उद्या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाल, पण महाराष्ट्राचा विचार तुमच्या मनातून जाता कामा नये, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या