औरंगाबादच्या नामांतरावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले...

औरंगाबादच्या नामांतरावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले...

पुणे । Pune

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात (Ganesh Kala Krida Manch Hall) धडाडली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह (sharad pawar) मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंवर (cm Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला...

यावेळी राज ठाकरेंनी संभाजीनगरच्या (Sambhajinagar) नामांतराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरचा उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असे विधान केले होते. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackera) या विधानाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील (pune) सभेत चांगलाच समाचार घेतला.

औरंगाबादच्या नामांतरावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले...
निवडणुका नाही तर उगाच भिजत भाषण का करायचं?; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

राज ठाकरेंनी यावेळी आपल्या भाषणात म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्या अंगावर आंदोलनाची एक तरी केस आहे का? हिंदुत्व किंवा मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी आजपर्यंत एकतरी भूमिका घेतली आहे का? दरवेळी उद्धव ठाकरे केवळ १९९३ च्या दंगलीची आठवण काढतात.

मुंबईच्या सभेत तर ते औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय, असेही बोलले. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत तरी कोण? तुम्ही महात्मा गांधी (Mahatma Gandhi) किंवा वल्लभभाई पटेल (Vallabhbhai Patel) आहात का?, असा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

औरंगाबादच्या नामांतरावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले...
राज ठाकरेंचा राणा दाम्पत्याला टोला, म्हणाले, “मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला...”

तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची (bjp and shivsena) केंद्रात सत्ता होती तेव्हा संभाजीनगरच्या नामांतरचा प्रश्न का सोडवला नाही? उद्या संभाजीनगरचे नामांतर झाले तर कशावर बोलायचे, हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडतो.

औरंगाबादच्या नामांतरावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले...
…म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, राज ठाकरेंनी सांगितलं ‘राज’कारण

त्यामुळे हा मुद्दा सतत पेटवत ठेवला जातो. संभाजीनगर, (Sambhajinagar) जालन्यात (jalna) १०-१० दिवस पाणी येत नाही. पण त्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विनंती करतो की, त्यांनी संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com