तक्रार मागे घ्या, अन्यथा गाठ आमच्याशी; आ. कांदेंना छोटा राजन टोळीकडून धमकी

तक्रार मागे घ्या, अन्यथा गाठ आमच्याशी; आ. कांदेंना छोटा राजन टोळीकडून धमकी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा नियोजन निधीच्या (Fund) वाटपावरून सुरू झालेल्या वादात आता अंडरवर्ल्डने (Underworld) उडी घेतली आहे. छोटा राजनच्या (Chhota Rajan) पुतण्याने फोन करून आ. सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांना धमकी दिली आहे. याबाबत पोलीस आयुक्तांना तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे...

दरम्यान, नांदगाव मतदारसंघाच्या डीपीडीसीच्या निधीवाटपासंदर्भात उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करण्यात आलेली होती. दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी आपल्याला अंडरवर्ल्ड डॅान छोटा राजनच्या माणसांनी फोन करून धमकावले, असा दावा शिवसेना आमदार कांदे यांनी केला आहे.

आ. कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याबाबत अद्याप सुनावणी झालेली नाही. आ. कांदे हे आनंदवल्लीच्या घरी असताना काल (दि.२७) रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास हा खटला मागे घ्यावा यासाठी छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) याने ९६६४६६६६७६ या क्रमांकावरून फोन केला.

हा खटला मागे घ्या, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असे धमकावले. असे नाशिक पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात आमदार कांदे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याप्रकरणाला दुजोरा दिला आहे.

यात माझा कोणताही संबंध नाही. उलट मला ज्या वेळी समजले तेव्हा मी लगेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना माहिती दिली. याबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनादेखील सांगितले आहे.

- छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक

Related Stories

No stories found.