Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या... तर पुन्हा 'मातोश्री'वर घरवापसी; बंडखोर आमदाराच्या विधानाने खळबळ

… तर पुन्हा ‘मातोश्री’वर घरवापसी; बंडखोर आमदाराच्या विधानाने खळबळ

मुंबई । Mumbai

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. या दोघांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेत बहुमत देखील सिद्ध करून दाखवले.तसेच मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ असल्याने बंडखोर (Rebel) आमदार स्वत:च्या मतदारसंघात परतले आहेत. यातच आता शिवसेनेत बंड करून शिंदे गटात सहभागी झालेले दिग्रसचे आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) यांचे आज यवतमाळ (Yavatmal) येथे आगमन झाले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे म्हटल्याने खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

यावेळी बोलतांना राठोड म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. तसेच पक्षातील उठावानंतर सर्वांचाच शिवसेना पक्षप्रमुख (ShivSena chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू असताना संजय राऊतांच्या (sanjay raut) अनावश्यक बडबडीमुळे ते शक्य झाले नाही, असा आरोप राठोड यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, आमची भूमिका हिंदुत्ववादीच आहे. आम्ही शिवसेनेत आहोत. तसेच शिंदे गटात गेलेल्या अनेक मंत्री, आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतील व पक्षातील गळचेपीबद्दल वारंवार सांगूनही आमच्या समस्यांकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे आत्मसन्मानार्थ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वासाठी व लोकहिताची कामे करण्यासाठी आम्हाला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही राठोड म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या