मुंबई पोलिसांची आमदार सदा सरवणकरांवर मोठी कारवाई

मुंबई पोलिसांची आमदार सदा सरवणकरांवर मोठी कारवाई

मुंबई | Mumbai

गणपती विसर्जनावेळी (Ganapati immersion) दादरमधील (Dadar) प्रभादेवीत (Prabhadevi) शिवसेना आणि शिंदे गटात (ShivSena and Shinde Groups) झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांनी त्यांच्या खासगी पिस्तुलमधून (Pistol) गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता याप्रकरणी दादर पोलिसांनी सरवणकर यांच्यावर मोठी कारवाई केली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police Station) गोळीबार (Firing) केल्याच्या आरोपाखाली आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात रविवारी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आज सरवणकर यांचे पिस्तुल जप्त केले असून हे पिस्तूल फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकरांना (Saadhan Saravankar) पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. तर आमदार सदा सरवणकरांनी मात्र गोळी झाडल्याच्या दाव्यास नकार दिला असून त्यांना पिस्तुल प्रकरण भोवण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com