Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या... तर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर काय करणार? आमदार रोहित पवारांना विद्यार्थ्यांचा सवाल

… तर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर काय करणार? आमदार रोहित पवारांना विद्यार्थ्यांचा सवाल

नाशिक | Nashik

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार आणि युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’ (Maharashtra vision Forum) या युवाकेंद्रित उपक्रमानिमित्त नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी शहरामधील केटीएचएम महाविद्यालयातील (KTHM College) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी रोहित पवारांना प्रश्न विचारले असता त्यांनी दिलखुलास उत्तरे देखील दिली. मात्र यामध्ये एका प्रश्नाचे उत्तर सर्वात चर्चेचे ठरले आहे.

- Advertisement -

आमदार रोहित पवार यांना ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘तुम्ही मुख्यमंत्री (Maharashtra CM) झाल्यावर महाराष्ट्रात पहिला बदल काय करणार? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना पवार म्हणाले की, मी एक पॅशनेट व्यक्ती असून खेळायला लागलो तर मनापासून खेळतो. मला क्रिकेट (Cricket) खेळायला आवडते. अशावेळी मला कॅप्टन बनवा किंवा व्हाईस कॅप्टन बनवा, किंवा ओपनिंगला उतरावा किंवा शेवटी उतरावा पण टीम कशी जिंकेल, या प्रयत्नात मी असतो, असे त्यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भीषण अपघात! ट्रकची ३ बसेसला धडक; १३ जणांचा मृत्यू, ५० जखमी

पवार पुढे म्हणाले की, बिजनेस म्हणा किंवा राजकारण ते मनापासून करतो. मी कोणत्याही पदासाठी काम करत नाही. महाराष्ट्रामध्ये विकासाचा समतोल ठेवण्यासाठी प्रत्येक युवाला विविध क्षेत्रात संधी देण्यासाठी योग्य धोरण कसे आखता येईल, यासाठी प्रयत्नशील राहू. आपल्या सर्वांचा वापर जसा केला जातो, तसं न होऊ देता आपल्या सर्वांची एका सकारात्मक दृष्टिकोनातून योग्य दिशेने कशी नेता येईल यासाठी उपाययोजना करता येईल, असे त्यांनी सांगितले.

Video : दोन एकर कांदा पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर

तसेच २०१४ आणि १९ मध्ये तरुण आमदारांची (MLA) संख्या घटली आहे. लोकसभेमध्ये सुद्धा घटली. आज खूप प्रश्न आहेत, अनेक पॉलिसी आपल्याला राबवायच्या आहेत, बदल घडवणे तुमच्या हातात आहे, ते तुम्ही लोकशाही मार्गाने मतदानाच्या (Voting) माध्यमातून करा, असे आवाहन यावेळी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

कसबा गणपतीसमोर रविंद्र धंगेकरांचे भाजप विरोधात उपोषण; कारण काय?

- Advertisment -

ताज्या बातम्या