राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष

 राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष

मुंबई । Mumbai

राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde Fadnavis government) दोन दिवसाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरु झाले असून या अधिवेशनात आज (३ जुलै) पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक प्रक्रिया पार पडली...

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) तर महाविकास आघाडीकडून (mahavikas aaghadi) राजन साळवींना (rajan salvi) उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी भाजपचे (bjp) उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते पडली.

तसेच समाजवादी पार्टी (Samajwadi Party) आणि एमआयएम (MIM) या पक्षाच्या आमदारांनी कुणालाही मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर मनसे व बहुजन विकास आघाडीच्या (MNS and Bahujan Vikas Aghadi) आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने त्यांच्या आमदारांना राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी व्हीप बजावला होता. परंतु शिंदे गटाने (shinde group) राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करत शिवसेनेच्या व्हिपला केराची टोपली दाखवली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com