आ. निलेश लंके म्हणतात.. हे सरकार फक्त जाहिरात बाजी आणि पोस्टरबाजीवर चालते

आ. निलेश लंके  म्हणतात.. हे सरकार फक्त जाहिरात बाजी आणि पोस्टरबाजीवर चालते

मुक्ताईनगर  Muktainagar

हे सरकार (Govt) फक्त जाहिरातबाजी आणि पोस्टरबाजीवर (advertising and postering) चालते  अशी जोरदार टीका आ. निलेश लंके (Strong criticism MLA Nilesh Lanka) यांनी रावेर तालुक्यातील ऐनपुर (Ainpur) येथे केली. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या (Nationalist Mass Communication Yatra Rohini Khadse) बाविसाव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील सांगवे, विटवे, निंबोल, ऐनपुर येथे ग्रामस्थांसमवेत संवाद (Communication with villagers) साधला.

यावेळी सांगवे येथील सदाशिव कोळी, दादाराम कोळी,खुशाल कोळी, धनराज कोळी,लिलाधर कोळी, अतुल कोळी, विकी कोळी, प्रविण कोळी, भगवान कोळी, तुषार कोळी, गोविंदा कोळी, किशोर कोळी, ज्ञानेश्वर कोळी  विटवे येथील उपसरपंचसुरेश कोळी, साहेबराव वानखेडे, गजानन कोळी, श्रीराम कोळी, गणेश मनुरे, वैभव पाटील,धनंजय पाटील,सतिष पाटील,संजय चिंचोले, दिपक पाटील,सुभाष धनगर,भगवान कोळी, नितीन अढागळे,शुभम पाटील,महेंद्र पाटील, निसार शेख, उस्मान शेख, ऋतिक कोळी, देवानंद कोळी, पद्माकर पाटील, नाना कोळी, कृष्णा पाटील, अनिकेत सोनवणे, गौरव कोळी, पंकज पाटील  निंबोल येथील सरपंच वंदनाताई पाटील, उपसरपंच अशोक पाटील, रामदास पाटील,भागवत सिताराम  पाटील,राहुल पाटील, हिरालाल पाटील, ईश्वर पाटील, गंभीर दांडगे, श्रीराम पाटील, गौरव सोनवणे, सदाशिव चौधरी, मोहन पाटील, प्रेम महाजन, कुंदन पाटील, अनिल कोळी, श्रीराम कोळी, सदाशिव तायडे, पंकज कोळी, योगेश धनगर, रामा धनगर, रणजित भिल, सोपान वानखेडे, रामदास मसाने, प्रमोद कोळी, देवानंद सपकाळ, रमेश वानखेडे आदींची उपस्थिती होती.

माजी मंत्री एकनाथराव खडसे, पारनेर चे आ.निलेश लंके, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र  पाटील,रोहिणी खडसे खेवलकर यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे,निवृत्ती पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान  पाटील, रावेर तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील ,बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील,जळगाव महानगराध्यक्ष अशोक  लाडवंजारी, अल्पसंख्याक सेल एजाज मालिक,माजी जि.प.सदस्य रमेश नागराज पाटील ,प.स.समिती सदस्य दिपक पाटील,योगेश  पाटील,युवक उपाध्यक्ष पवन पाटील,रावेर शहराध्यक्ष मेहमूद भाई,अतुल पाटील,काशिनाथ महाजन, सरपंच अमोल महाजन,किशोर पाटील,माया बारी, विकास पाटील,रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रोहिणी खडसे ह्या मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, गेल्या तिस वर्षेपासून एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात अनेक विकास कामे केली.त्याच विकास कामाच्या जोरावर जनतेने तिस वर्ष निवडून दिले.काही लोकांनी केलेल्या विश्वासघातकी कृत्यामुळे माझा थोड्या मतांनी पराभव झाला.परंतु नव्वद हजार मतदारांनी मला निवडून दिले.त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हि जनसंवाद यात्रा काढली आहे.मुक्ताईनगर मतदारसंघातील 182 गाव वस्त्यांवर हि यात्रा जाणार असून समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र  पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले , जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी रोहिणी खडसे यांनी सुरू केलेला जनसंवाद यात्रेचा स्तुत्य उपक्रम असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या अडीअडचणी सोडविल्या जातील. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद होण्याचे त्यांनी आवाहन केले.

पारनेरचे आ.निलेश लंके हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले , एकनाथराव खडसे यांनी पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कामे केली आहेत.माझ्या मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामा मुळे सिंचनाची सोय झाली आहे.

गेले अनेक वर्षे त्यांनी विकासाचे राजकारण केले आहे.त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून रोहिणी खडसे या कार्यकरत आहेत.येत्या काळात त्यांना भरघोस मतांनी विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारवर टिका करताना लंके म्हणाले, 

राज्य सरकार बाबत बोलायलाच नको, हे राज्य सरकार फक्त जाहिरात बाजी आणि पोस्टरबाजीवर चालते, अशी जोरदार टीका त्यांनी केली.

लंके पुढे म्हणाले की. गोरगरिबांना ‘आनंदाचा शिधा’ दिवाळी संपली तरीही मिळाला नाही, शिधा वाटप केल्याच्या मोठमोठे जाहिराती अन् अध्यापपर्यंत गरिबांना शिधा मिळाला नाही तसेच ओल्या दुष्काळाने शेतकरी हतबल झाला असून अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली मात्र, अजून ही ओला दुष्काळ जाहीर केला नाही.

या सरकारने दुरवस्था केली

त्यांचा एक मंत्री म्हणतो पाऊसच झाला नाही, मंत्र्यांनाच माहित नाही पाऊस झाला की नाही. या सरकारने दुरवस्था केली आहे अशी जोरदार टीकाही लंके यांनी यावेळी केली.

एकनाथराव खडसे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले गेले तिस वर्ष जातीपातीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण केले त्या जोरावर तुम्ही मला निवडून दिले.काही लोकांनी दगा फटका केल्यामुळे गेल्या विधानसभेत रोहिणी ताईंचा थोड्या मतांनी पराभव झाला

आज विरोधक तिस वर्षात काय केले हे विचारत आहेत परंतु जे विकास कामे दिसतात ते तीस वर्षात नाथाभाऊ यांनीच केले. विरोधकांकडून सातत्याने छळ करून मला अडकविण्यात येत आहे. काही ना काही खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुरळीत करायच्या, असा त्यांचा प्रयत्न आहे. पण तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, असे म्हणत एकनाथ खडसेंनी सरकारला आव्हान दिले आहे. माझा कितीही छळ केला. मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या ऊरावर बसेन, असा हल्लाबोलही त्यांनी सरकारवर केला

रंग बदलणाऱ्या अशा विकाऊ लोकांना घरी बसवा -- सक्षणा सलगर

 या संवाद यात्रेच्या प्रसंगी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांची उपस्थिती होती.या म्हणाल्या की, मुक्ताईनगरचे आमदार हे राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांवर निवडून आले निवडून आल्यावर त्यांनी रंग बदलवत शिवसेनेला पाठींबा दिला तिथं पण त्यांचे मन रमले नाही. तेठाकरेसाहेबांची साथ सोडून शिंदे गटात गेलेपन्नास खोके घेऊन त्यांचे सब कुछ ओके सुरू असून जनतेला त्यांनी व सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.येत्या काळात तुम्ही अशा विकाऊ लोकांना घरी बसवा व रोहिणी खडसे यांना निवडून द्या , असे त्यांनी आवाहन केले.

रवी राणा आणि बच्चू कडू वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राणांनी बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावर बच्चू कडू यांनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध करण्याचं आव्हानच दिलं आहे. बच्चू कडू यांनी आपल्या संपर्कात सात ते आठ आमदार असून पुरावे नाही दिले तर निर्णय घेण्याचा इशाराही दिला आहे.

त्यांनी एकप्रकारे सरकारलाच आव्हान दिलं आहे. बच्चू कडू यांची ही सुरुवात आहे. त्यामुळे शिंदे गटात गेल्या बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे. हळूहळू ही अस्वस्थता बाहेर येत आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही सुरुवात आहे, असा दावा एकनाथराव खडसे यांनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com