आ. मंगेश चव्हाणांचा आ. खडसेंना पुन्हा धक्का

आ. मंगेश चव्हाणांचा आ. खडसेंना पुन्हा धक्का

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बहुचर्चित राहिलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (Jalgaon District Cooperative Milk Producers Union) सन 2021 मध्ये राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया (Recruitment process) रद्द (canceled)करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन आमदार मंगेश चव्हाण (Chairman MLA Mangesh Chavan) यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना दिली. दरम्यान हा निर्णय राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला संचालक संजय पवार, पूनम पाटील, रोहित निकम, प्रमोद पाटील, अरविंद देशमुख आदींसह कार्यकारी संचालक मोरखडे उपस्थित होते. सन 2021 मध्ये तत्कालीन चेअरमन मंदाताई खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने भरती प्रक्रिया राबविली होती. 104 जागांसाठी दूध संघाने भरती प्रक्रिया राबवून मुलाखतीही घेतल्या होत्या. मात्र राखीव जागांच्या मुद्यावरून या भरती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले. तसेच या भरती प्रक्रियेवरून तत्कालीन संचालक मंडळावर भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांनी आरोप केले होते. दरम्यान आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नोकर भरतीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती ही नोकर भरती रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

माजी संचालकांना ‘दे धक्का’

तत्कालीन संचालक मंडळाने राबविलेली भरती प्रक्रिया चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने रद्द ठरविल्याने खडसेंसह माजी संचालक मंडळाला ‘दे धक्का’ दिला आहे. या नोकर भरतीसाठी मोठे अर्थकारण झाल्याची चर्चा त्यावेळी होती. त्यामुळे भरती रद्दच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

*भरती प्रक्रियेशी आमचा संबंधच नाही- * जिल्हा दूध संघात राबवण्यात आलेल्या नोकर भरती प्रक्रियेशी तत्कालीन चेअरमन मंदाताई खडसे यांचा कुठलाही संबंध नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ज्या काळात ही भरती प्रक्रिया राबवली गेली त्या काळात तत्कालीन चेअरमन मंदाताई खडसे या रजेवर होत्या. तेव्हा पूर्वीच्या संचालक मंडळाने या भरती प्रक्रियेला मान्यता दिली होती. पूर्वीच्या संचालक मंडळातील काही जण विद्यमान संचालक मंडळात आहेत. जर ही भरती प्रक्रिया बेकायदेशीर असेल तर मग विद्यमान संचालक मंडळातील संचालकांवरही हा ठपका लागू होतो. भरती प्रक्रियेतील उमेदवार हे आज दूध संघात कार्यरत आहेत. विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या ठरावानुसार हे उमेदवार आजच घरी बसतील त्यांचे कुटुंब उघड्यावर येईल. सूडबुद्धीने निर्णय घेण्यापेक्षा न्यायालय काय निर्णय देते याची वाट पाहणे संचालक मंडळासाठी संयुक्तिक ठरेल असेही आमदार खडसे यांनी सांगितले

आ.खडसे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com