शिक्षकप्रश्नी उपोषणाचा इशारा; आमदार किशोर दराडेंचा आक्रमक पवित्रा

शिक्षकप्रश्नी उपोषणाचा इशारा; आमदार किशोर दराडेंचा आक्रमक पवित्रा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात गुरुवारी (दि.१७) पासून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे (Commissioner Education Maharashtra State Pune) यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिक्षक आमदार किशोर दराडे (MLA Kishore Darade) यांनी दिला आहे...

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesrak) यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, माजी आमदार दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे यांच्यासह आपण १७ ऑगस्टपासून उपोषण करणार आहोत. राज्यातील सर्व स्तरावरील शालार्थ आय.डी. प्रकरणे निकाली काढावे. वाढीव पदाची माहिती (कनिष्ठ महाविद्यालय) शासनाला तत्काळ पाठवावी. नाशिक विभागातील जळगाव, अहमदनगर व नाशिक जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मासिक वेतन राष्ट्रीयकृत बँकेत होण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करावा.

तसेच नाशिक विभागातील २० टक्के, ४० टक्के, ६० टक्क्यांवर असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन हे एक तारखेला व्हावे व यासाठी निधीची तरतूद करावी, बी.एल.ओ.च्या कामातून मुख्याध्यापक व महिला शिक्षकांना वगळावे. सन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन मिळावी. १७ ऑगस्टपूर्वी राज्यातील विभागीय शिक्षणाधिकारी, उपसंचालक व विभागीय अध्यक्ष मंडळ यांच्याकडे शालार्थ आयडीसाठी १ एप्रिलपासून किती प्रकरणे दाखल झाली? त्यात किती त्रुटी कळवल्या, याबाबतची माहिती मिळावी, अशी मागणीही आ. दराडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com