Thursday, April 25, 2024
Homeजळगावशिंदे-फडणवीस सरकारबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी केला मोठा दावा...

शिंदे-फडणवीस सरकारबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी केला मोठा दावा…

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सुप्रिम कोर्टाचा (Supreme Court) येणारा निकाल (result) हा सरकारविरोधी असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आतापर्यंतच्या सुनावणीवरुन हे सरकार कोसळेल (government will collapse), अस मत जनमाणसांच झालं आहे, सरकार आठ दिवस राहतं की, 15 दिवस मात्र निर्णय हा लागेलच, त्यामुळे आपल्या सोयीच्या फाईल मंजुर करुन ठेवायच्या, तातडीने फायली मागवायच्या हा उदयोग सध्या सुरु आहे. त्यामुळेच सरकारमधील मंत्री व्दिधा मनस्थितीत आहेत, अशी टीका आमदार एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांनी केली.

- Advertisement -

कुशीनगर एक्सप्रेसच्या जनरल डब्याला आग

जळगाव शहरातील दीक्षितवाडीतील पुतळा हटविल्याप्रकरणी शनिवारी आमदार खडसे यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी ते वार्तालाप करीत होते.

आमदार खडसे पुढे म्हणाले की, दूध संघात आता ज्यांची सत्ता आहे, त्यांनीच मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला आहे, आधी त्याबाबत गुन्हे दाखल करा, यांच्या कालखंडातच तुपाचे नुकसान झाले, गुंडागिरी, दादागिरीने कधी प्रश्न सुटत नसतो, लोकशाही पध्दतीने जे योग्य असेल ते करा..असे म्हणत एकनाथ खडसेंनी यांनी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांना उत्तर दिले आहे.

तुपाचा घोटाळा झाला असून त्याबाबतही गुन्हा दाखल करणार असल्याचं मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय, त्यावर खडसेंनी उत्तर दिलं आहे. संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे सुरु आहेत, गांजा आणि गुटख्यावर नियंत्रण आणलं पाहिजे, मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्ह्यात गुटख्याची तस्करी होते, मी विधानसभेत प्रश्न उपस्थित करताच, कारवाई झाली, जिल्ह्यात पोलीस मोठ्या प्रमाणावर हप्ते घेतात, राजकीय संरक्षण असल्याशिवाय हे उद्योग सुरु राहू शकत नाही, अनेक प्रश्न विधानसभेत विचारले, पुराव्यानिशी प्रश्न मांडले, पण सरकारने उत्तर दिले नाही, राज्यभरात पोलीसांच्या कशा बदल्या झाल्या, याचेही सरकारनेही उत्तर दिलं नाही, एकंदरीत गैरव्यवहाराला सरकार पाठींबा देत आहे, पाठीशी घालतं आहे,अशी टीका त्यांनी केली.

महामार्गाच्या ठेकेदाराच्या चुकीचा आयशर चालक ठरला बळीभडगाव शहरासह तालुक्यात सर्रास अवैध वृक्षतोड

नुकसानींचे पंचनामे कोण करणार

एकीकडे मंत्री अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत देवू सांगतात, तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी संपावर आहेत, तलाठी, कृषी अधिकारी संपावर आहेत, मग पंचनामे कोण करणार मात्र यासाठी पर्यायी व्यवस्था सरकारने केली पाहिजे,असेही आमदार खडसे म्हणाले.

यावलला 14 आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा

- Advertisment -

ताज्या बातम्या