एका फोनवर अडली सेना-भाजप युती; केसरकरांचा गौप्यस्फोट

एका फोनवर अडली सेना-भाजप युती; केसरकरांचा गौप्यस्फोट

मुंबई । Mumbai

शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने (Shinde Group) भाजपबरोबर सरकार बनवल्यानंतर आता शिवसेना-भाजप युतीची (Shiv Sena-BJP alliance) चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांची युती केवळ मानपानात अडकली असून पहिला फोन कुणी करायचा यावरून खोळंबली आहे, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. त्यामुळे अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदावरुन फिस्कटलेली शिवसेना (Shivsena) आणि भाजपची (Bjp) युती एका फोनने पुन्हा होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे...

यावेळी केसरकर म्हणाले की, शिवसेना हे कुटुंब आहे.आम्हाला २-३ लाख लोक निवडून देतात. बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर आधारित आमचा विचार आहे. आपल्याला ते हिंदुत्व घेऊन पुढे जायचे आहे. बाळासाहेबांनी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी (Congress-NCP) आघाडी केली नसती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाईलाजास्तव महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जाण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी आपल्याला जे सांगितले ते ऐकायचे की पवारांचे ऐकायचे हे शिवसैनिकांनी ठरवावे असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शरद पवारांना (Sharad Pawar) पुन्हा सत्तेत यायचे आहे. शिवसेनेने पवारांच्या पालखीचे भोई होऊ नये. शिवसेना चार वेळा फुटली ती शरद पवारांमुळेच त्यामुळे जे घडले ते सांगण्यात कुठे पाप आहे का? मराठी माणसाला ताठ मानाने जगायला बाळासाहेबांनी शिकवले. आज,उद्या आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार पुढे घेऊन जाऊ.तसेच कलम ३७०, राम मंदिर (Ram Mandir Temple) हे बाळासाहेबांच्या विचार होते ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केले. मानापमान नाट्यात महाराष्ट्राचे हित जोपासले जावे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com