Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याकांदा मुद्द्यावरून विधानसभेत घमासान; भुजबळ-आहेर यांच्यात खडाजंगी

कांदा मुद्द्यावरून विधानसभेत घमासान; भुजबळ-आहेर यांच्यात खडाजंगी

मुंबई | Mumbai

राज्यभरात (Maharashtra) कांदा प्रश्न चांगलाच पेटला असून आज सकाळी (दि.२८) विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सभागृहात (Budget Session) देखील याचे पडसाद उमटले. यावेळी कांद्याची निर्यात वाढवण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले…

- Advertisement -

तसेच कांदा खरेदी सुरु झाली असून जेथे कांदा खरेदी सुरु झालेली नाही तेथे ती सुरू केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिली. त्यानंतर या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (MLA Chhagan Bhujbal) आणि चांदवडचे भाजप आमदार डॉ. राहुल आहेर (MLA Dr.Rahul Aher) यांच्यात कांदा (Onion) प्रश्नांवरुन चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांचे नीलम गोऱ्हेंना पत्र

यावेळी भुजबळ म्हणाले की, राज्यातील कांद्याचे दर कोसळले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाने कांदा निर्यातीला अधिक प्रोत्साहन देण्यासोबत नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच बांगलादेशांत द्राक्ष निर्यात करण्यासाठी असलेली इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः बांगलादेशाच्या पंतप्रधानांशी बोलून प्रश्न मार्गी लावावा. यासाठी राज्यशासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी सभागृहात केली.

उद्यापासून बदलणार ‘हे’ नियम; जाणून घ्या सविस्तर

त्यानंतर आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कांदा प्रश्नी सभागृहात मत मांडण्यास सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, “निर्यात खुली असून नाफेडने देखील आजपासून कांदा खरेदी करण्यास सुरवात केली आहे. एकीकडे कांद्याची अवाक वाढली असून दुसरीकडे बाजारभाव पडले आहेत. मात्र आम्ही राज्य सरकारकडे हमीभाव द्यावा अशी मागणी करत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, त्याचवेळी भुजबळ यांनी आहेर यांना थांबवत रोष व्यक्त केला. यावेळी अध्यक्षांनी भुजबळांना थांबवत त्यांना बोलू द्या,” असं सांगितलं. त्यावेळी आपला मुद्द मांडताना डॉ. आहेर म्हणाले की, “केंद्र राज्य सरकारकडे कांद्याला योग्य भाव देण्यासाठीची मागणी आम्ही देखील करत आहोत, आम्हाला देखील शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांची जाणीव आहे.” असे म्हटले.

Viral Video : तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…

- Advertisment -

ताज्या बातम्या