Maharashtra Politics : "वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या..."; भास्कर जाधवांचा बावनकुळेंवर निशाणा

Maharashtra Politics : "वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या..."; भास्कर जाधवांचा बावनकुळेंवर निशाणा

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथील सभेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता या टीकेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत असून भाजप आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडतांना दिसत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे....

Maharashtra Politics : "वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या..."; भास्कर जाधवांचा बावनकुळेंवर निशाणा
IND vs SL Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये भारताचा आज लंकेशी सामना, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग-11

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देतांना उद्धव ठाकरेंना यापुढे 'घरकोंबडा' म्हणावे लागेल. कारण, ठाकरेंनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आता या टीकेला आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून वेस्ट इंडिजच्या (West Indies) खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा, असा इशारा दिला आहे.

Maharashtra Politics : "वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या..."; भास्कर जाधवांचा बावनकुळेंवर निशाणा
Ind vs Pak Asia Cup 2023 : भारत अन् पाकिस्तान पुन्हा भिडणार! कसं ते जाणून घ्या

यावेळी बोलतांना भास्कर जाधव म्हणाले की, "चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका (Criticism) करतात. कधी घरकोंबडा तर आणखी काही म्हणतात. मी गेल्यावेळी बावनकुळेंना वेस्ट इंडिजचा खेळाडू बोलल्यावर व्यक्तीगत टीका केली म्हणाले. मग, उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणता, ही व्यक्तीगत टीका नाही का? वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? तुम्हाला आणि फडणवीसांना काही बोलायचे नाही. आमच्या पक्षप्रमुखांवर तुम्ही वाटेल ते बोलणार का? हे चालणार नाही. वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम लावावा," अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी बावनकुळे यांचा समाचार घेतला.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्या या टिकेला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात भाजप आणि ठाकरे गटात (BJP and Thackeray Group) वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. तसेच ठाकरे गटाकडून भाजपवर पलटवार देखील केला जाऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Maharashtra Politics : "वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या..."; भास्कर जाधवांचा बावनकुळेंवर निशाणा
संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले...

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com