मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले...

मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले...

मुंबई । Mumbai

गेल्या महिनाभरापासून रखडलेला राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet expansion) पहिला टप्पा ३८ दिवसानंतर आज पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजप (Shinde group and BJP) मिळून एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ (oath) घेतली. मात्र या मंत्रिमंडळात एकाही अपक्ष किंवा मित्र पक्षाला स्थान न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. यावर आता आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे...

यावेळी बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये अपक्ष (independent) आणि मित्रपक्षांना स्थान द्यायला हवे होते. खरंतर अपक्ष आणि मित्रपक्षांनी मिळून हे सरकार बनले आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की महिनाभरात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा अपक्ष आणि मित्रपक्षाचा नक्की विचार केला जाईल. काही अडचणींमुळे या टप्प्यात विचार केला नसेल. मात्र महिनाभरात काय होते बघू असेही ते म्हणाले .

पुढे ते म्हणाले की, मी स्वत:साठी कधीच नाराज होणार नाही. पण दिव्यांग (disabled) आणि शेतकऱ्यांसाठी नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सांगितले आहे की, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढचा मंत्रीमंडळ विस्तार होईल. तेव्हा तुम्हाला संधी देऊ, असेही ते म्हणाले. तसेच आज सकाळी मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना बच्चू कडू हे विधानभवनात असल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर देखील त्यांनी खुलासा केला असून विधानभवनात (Vidhan Bhavan) काही काम होते. त्यामुळे शपथविधीला न जाता इथे येऊन तो वेळ आम्ही इथे कामी लावला' असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com