
नाशिक | Nashik
प्रहारचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik District Sessions Court) दोन वेगवेगळ्या प्रकरणात २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आता याप्रकरणी बच्चू कडूंना मोठा दिलासा मिळाला आहे...
२०१७ साली नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन (Agitation) सुरु होते. त्यावेळी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांना धमकावणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता.
त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर याप्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी (Hearing) सुरु होती. आज याप्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यावर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
या निकालानंतर कडूंनी माध्यमांशी संवाद साधत जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी (Bail) अर्ज करणार असल्याचे म्हटले होते. यानंतर न्यायालयाने (Court) १५ हजारांच्या जातमुचलक्यावर बच्चू कडूंना जामीन मंजूर केला असून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तसेच उच्च न्यायालयात अपीलाच्या कालावधीपर्यंतच त्यांना हा जामीन मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.