आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा; नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

बच्चू कडू
बच्चू कडू

नाशिक | Nashik

प्रहारचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik District Sessions Court) दोन वेगवेगळ्या प्रकरणात २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे...

बच्चू कडू
मुंबईत नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

याबाबत अधिक माहिती अशी की, २०१७ साली नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन (agitation) सुरु होते. त्यावेळी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांना धमकावणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी (Hearing) सुरु होती. यानंतर आज याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

बच्चू कडू
अवकाळीचा तडाखा! राज्यात १३ हजार ७२९ हेक्टरवर नुकसान

दरम्यान, पोलिसांनी (Police) सध्या आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून त्यांना नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तसेच निकालानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, या निकालाविरोधात उच्च न्यायालयात (High Court) जाणार असून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

बच्चू कडू
... तर सरकारला ते शोभत नाही; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com