'मैं झुकेगा नही' म्हणत बच्चू कडूंनी रवी राणांना डिवचले

बच्चू कडू
बच्चू कडू

मुंबई | Mumbai

अमरावतीमधील (Amravati) बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणा यांनी माघार घेतली आहे...

मी माझे शब्द मागे घेतो म्हणत रवी राणा यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बच्चू कडू यांनी या वादावर अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यानंतर आज बच्चू कडू अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar Jan Shakti Party) पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून एका दिव्यांग बांधवाच्या मेळाव्यातून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

या मेळाव्यापूर्वी अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू यांचे "मै झुकेगा नही''असे पोस्टरर्स कार्यकर्त्यांनी झळकावून रवी राणांना डिवचले आहे. आमदार रवी राणा यांनी कडू यांच्यावर गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांशी झालेल्या चर्चेनंतर राणा यांनी वक्तव्य मागे घेतले होते.

दरम्यान, बच्चू कडूंनी म्हटले आहे की, लोकांचे काय मत आहे, हे आजच्या दिव्यांग (Disabled) बांधवाच्या मेळाव्यातून जाणून घेण्यात येईल. त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. तसेच आजच्या मेळाव्याची कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे. रक्ताचे पाणी करून आम्ही हे संघटन उभारलेले आहे. त्यामुळे कोणासमोरही झुकण्याचा प्रश्न येत नाही. काही लोकांना असे वाटते की आम्ही पदासमोर, पैशासमोर झुकू. मात्र आम्ही झुकणारे नाही. पैसा, पद आणि सत्तेसमोर आम्ही झुकणारे नाही. तसे असते तर आम्ही आरोप सहन केले असते, असे कडू यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com