Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रबच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरला अल्टीमेटम; काय आहे प्रकरण...

बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरला अल्टीमेटम; काय आहे प्रकरण…

मुंबई | Mumbai

राज्याचे माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी सचिन तेंडूलकरला (Sachin Tendulkar) १५ दिवसांचा अल्टिमेटम (15 Days Ultimatum) दिला आहे. सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीत (Online Game Advertisement) भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

आमदार बच्चू कडू यांनी हा इशारा दिला असून सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमबाबत स्पष्टीकरण दिले पाहीजे. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत आणि ते देशाचा अभिमान आहे. ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी माघार घ्यावी. तसेच त्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी बाहेर पडले पाहिजे. ही आमची विनंती आहे. ते नाही झाले तर आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होणार, ‘या’ तारखेपासून सर्वदूर बरसणार

भारतीयांची ऑनलाईन गेममधून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही सचिन तेंडूलकर यांना नारळ पाणी देऊ. पालकांमध्ये प्रचंड रोष आहे. गेममध्ये अधिक पैसे गुंतवू नका, अशी जाहिरात करायची आणि दुसरीकडे गेमची जाहिरात करायची, असे धंदे सुरु आहेत. आमचे आंदोलन नेहमी अनोखे असते. यावेळीही तसेच असेल. आम्ही सचिन तेंडुलकर यांना नारळपाणी देण्याचे आंदोलन करणार आहोत. लोक सुपारी घेतात, तुम्ही नारळ घ्या. जाहिरातच नाही तर ऑनलाईन गेमच हद्दपार करा, अशी विनंती सचिन यांना करू, असे बच्चू कडू म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना दिले होते पत्र

दरम्यान, याबाबत बच्चू कडूंनी या पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे पत्र दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या पत्रात म्हंटले होते की, “सचिन तेंडुलकर हे प्रसिध्द क्रिकेटर असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करित असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान थोर सर्व स्तरापर्यंत होतो व या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्वस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत.

Independence Day : कॅबिनेट मंत्री की जिल्हाधिकारी… १५ ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण? वाचा संपूर्ण यादी…

” सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत, राज्यात ऑनलाईन गेम बंद व्हावे यासाठी आमचा सचिन यांच्या जाहिरातीला विरोध आहे. त्यामुळेच आमचा त्यांनी जाहिरात करण्यावर विरोध आहे. ते भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलन केले नसते. सचिन यांनी जाहिरातीतून माघार घेण्यासाठी आम्ही त्यांना १५ दिवसांची मुदत देऊ आणि त्यानंतर आम्ही आंदोलन करणार आहोत, असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या