
मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांना शासनाकडून मंत्रीपदाचा दर्जा जाहीर केला आहे...
'दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी' या लोककल्याणमारी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे. शासनाने परिपत्रक काढून त्यांना हा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.
यात राज्यस्तरीय सदस्यांची समिती गठीत करण्यात आली असून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव, आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे, उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अशी जिल्ह्याची समिती असेल.