Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याअमोल मिटकरींचा मोहित कंबोज यांना टोला; म्हणाले...

अमोल मिटकरींचा मोहित कंबोज यांना टोला; म्हणाले…

मुंबई | Mumbai

भाजपा नेते (BJP leader) मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party) एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आहे. ते मुंबईत विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलत होते.

यावेळी अमोल मिटकरी म्हणाले की, मोहित कंबोज यांनीच भोंगे वाटले होते. ते भाजपाचे भोंगे आहेत. शेतकरी (farmer) जीसएटीच्या प्रश्नावर बोलताना ते दिसत नाहीत. ईडीच्या (ED) दारात बसून त्यांनी ही माहिती मिळवली आहे का? मोहित कंबोजचीही चौकशी झाली पाहिजे.

ईडी कोणाच्या घरी धाड टाकेल त्यासंबंधी ट्वीट करत असेल, पत्रकार परिषद घेणार असतील तर हे संशयास्पद आहे. मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता, माणूस, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे सर्वांना माहिती आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, मोहित कंबोज यांनी एकूण तीन ट्विटस केली आहेत. यापैकी तिसऱ्या ट्विटमध्ये कंबोज यांनी २०१९ मध्ये परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळा प्रकरणाची (Irrigation scam case) चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या