Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराहुल शेवाळेंच्या 'त्या' आरोपावर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...

राहुल शेवाळेंच्या ‘त्या’ आरोपावर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | Mumbai

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी आरोप केल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, मला त्या घाणीत अजिबात जायचे नाही. ज्यांची निष्ठा त्यांच्या स्वत:च्या घरात नसते. त्यांनी आमच्याशी गद्दारी केली. त्यांच्याकडून आम्हाला चांगलं काहीही अपेक्षित नाही. हे ४० गद्दार आमदार आणि ते १२ गद्दार खासदार यांना आता सगळेच अडचणीत आणत आहे. त्यांचे नवीन मित्रपक्षही त्यांना अडचणीत आणत आहेत.

आमच्याकडून विधानसभेत  महापुरूषांचे अपमान, एनआयटी भूखंड घोटाळा आणि सीमावादासह अनेक प्रश्नांवर सभागृहात प्रश्न उपस्थित केले. परंतु, आम्हाला बोलू दिले जात नाही. राज्यातील खरे प्रश्न बाजूला सारून अशा प्रश्नांवरून बदनामी करण्याचा घाणेरडा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील प्रश्नांनर बोलायला गेले की माईक बंद केले जातात. राज्यपाल (Governor) सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतांना त्यांना पदमुक्त करण्यापेक्षा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, राज्यपालांविरोधात आज आम्ही सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आमच्या विरोधात घोषणा देत आम्हाला बोलू दिले नाही. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचे लक्षात येते. एनआयटी घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. कोर्टाने देखील त्यांच्यावर ताशेरे ओढले असून या प्रकरणातून त्यांना वाचवण्यासाठी घाणेरडे मुद्दे पुढे करून बदनामी केली जात असल्याचे ठाकरेंनी सांगितले.

राहुल शेवाळे काय म्हणाले होते?

खासदार राहुल शेवाळे संसदेत बोलतांना म्हणाले की, रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने ४४ कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितल्याचे त्यांनी म्हटले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या