सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कुणाचे? यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून (Election Commission) केल्या जाणाऱ्या कार्यवाहीवर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता निवडणूक चिन्हाबाबतची पुढील सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे. त्यावर आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे…

ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठी आम्ही तयार आहोत. लोकशाही आणि संविधानासाठी (Democracy and Constitution) हा लढा महत्त्वाचा ठरेल. तसेच हा आमच्यासाठी धक्का नसून दिलासाही नाही, फक्त युक्तीवादाचे कोर्ट बदलले आहे. सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेले आहे. आमचा लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी (Hearing) आम्ही पूर्णपणे तयार असून आम्ही सत्त्याच्या बाजूने आहोत. त्यामुळे विजयादशमीला सत्याचा विजय झाला तसाच शिवसेनेचा (Shivsena) विजय होणार, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *