Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआदित्य ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, हे सरकार...

आदित्य ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, हे सरकार…

नाशिक | Nashik

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नगरसेवकांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्याने नाशकात (Nashik) ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले होते. त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) दोन वेळा नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. मात्र तरी देखील ठाकरे गटाला डॅमेज कंट्रोल रोखण्यात सातत्याने अपयश येत असल्याचे दिसत आहेत.

- Advertisement -

अशातच आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) हे शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर असतांना पुन्हा एकदा ठाकरे गटातील ५० हून अधिक जुन्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता आमदार आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेत बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

यावेळी ठाकरे म्हणाले की, आपले मुख्यमंत्री २८ तास डाव्होसला गेले होते. खर्च झाले ४० कोटी, पण उद्योग किती आले हे अजून सांगू शकले नाहीत. इकडे-तिकडे आकडे सांगतात आहेत. मी तर त्यांना सांगेन की तुम्ही १०० लाख कोटीच सांगा. कुणाला किती शून्य आहेत त्यात ते कळणारच नाही. आम्ही फसत राहू, पण आज महाराष्ट्र फसणार नाही, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, आज जे सरकारमध्ये (Government) बसले आहेत ते स्वत:साठी रोजगार शोधत आहे, स्वत:साठी दिल्लीत जातात. स्वत:साठी सूरतला जातात. स्वत:साठी गुवाहाटीला जातात. झाडं, डोंगर बघून येतात. पण लोकांसाठी काही मागितलेलं तुम्ही ऐकले आहे का? तसेच कधी तुम्ही ऐकलंय की, लोकांसाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि महाराष्ट्रासाठी (Maharashtra) काहीतरी मगितलं आहे. कारण असे कधीच घडलं नाही. त्यामुळे हे सरकार पडणार म्हणजे पडणार हे तुम्ही लिहून घ्या. मुख्यमंत्री दिल्लीत फक्त स्वत:साठी जातात, लोकांसाठी जात नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही. त्यामुळे तुम्ही लिहून घ्या हे मंत्रीमंडळ तर पडणारच आहे. पंरतु, पडण्याआधी विस्तार होणार नाही, फक्त गाजरं देऊन ठेवली आहेत. सगळ्या आमदारांना तुला मंत्री बनवतो असे म्हटले जात आहे. पण आता एकही नवीन मंत्री बनणार नाही. या मंत्रीमंडळात कुणी तरुण मंत्री, शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारा किंवा महिलांचा आवाज ऐकणारा नसल्याने हे सरकार चालणार कसं? हे सरकार नक्की कुणाचं आहे. दिल्लीश्वरांचं आहे की महाराष्ट्राचं हा प्रश्न पडला आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या