Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामिशन नाशिक मनपा : नवीन नाशकात इच्छुकांकडून चाचपणी

मिशन नाशिक मनपा : नवीन नाशकात इच्छुकांकडून चाचपणी

नवीन नाशिक | निशिकांत पाटील New Nashik

गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागरचनेकडे (Ward Structure) लक्ष ठेवून असतानाच अखेर प्रभागरचना जाहीर होताच नवीन नाशकात (New Nashik ) विद्यमान लोकप्रतिनिधींसह इच्छुकांमध्ये आपण नेमके कोठून उभे राहावे याकरता चाचपणी सुरू झाली आहे.

- Advertisement -

नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित प्रभाग 30 ते 38 असे एकूण नऊ प्रभाग करण्यात आले आहेत. यात तीन प्रभाग वाढले असून नगरसेवकांची संख्या 27 झाली आहे. पूर्वी सहा प्रभाग व 24 नगरसेवक Corporators या ठिकाणी होते. सातपूरला जोडलेला प्रभाग 26 चा काही भाग पुन्हा नवीन नाशिक परिसरात वर्ग करण्यात आला आहे.

शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार अपूर्व हिरे हे नवीन नाशकातच वास्तव्यास असून आमदार सीमा हिरे यांचे संपर्क कार्यालय असल्याने सर्वच पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

प्रभाग 36 चा अंबड गाव व परिसरात समावेश झाल्याने माजी नगरसेवक तानाजी फडोळ व उत्तम दोंदे यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

शिवसेनेचे दीपक बडगुजर व भाजपचे विद्यमान नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता.

प्रभाग 30 मध्ये शिवसेनेचे चुंभळे, पांडे, तिदमे व गायकवाड असल्याने तेथील एका उमेदवाराची तारांबळ उडणार आहे. याच प्रभागात आमदार कन्या रश्मी हिरे निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक 35 ची मांडणी पूर्णत: बदलण्यात आली आहे. त्यात घरकुल, मोरवाडी, उत्तमनगर, सिम्बॉयसिस, अंबड गावचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर अपक्ष उमेदवारी केलेले चित्रा अमृतकर व प्रकाश अमृतकर हे दोघेही पुन्हा शिवसेनेकडून रिंगणात येणार आहेत.

पूर्वीचा व आताचा प्रभाग

-प्रभाग 30 (पूर्वीचा 24) : गोविंदनगर, शिवाजी चौक, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, खांडे मळा, बडदेनगर, लेखानगर, भुजबळ फार्म, बालभारती मागील स्लम परिसर, अचानक चौक, लाईफ केअर हॉस्पिटल, अनमोल नयनतारा.

-प्रभाग 31 (पूर्वीचा 25) : सावतानगर, पाटीलनगर, सुभाषचंद्र बोस गार्डन, पेठे विद्यालय, त्रिमूर्ती चौक, जीएसटी भवन.

-प्रभाग : 32 (पूर्वीचा 25/26) : कामटवाडे, धनवंतरी कॉलेज, शिवशक्ती चौक.

– प्रभाग : 33 (पूर्वीचा 26/28) : खुटवडनगर, कार्तिकेयनगर, कृष्णानगर, जनकनगर, केवल पार्क, अजमेरीनगर.

-प्रभाग : 34 : (पूर्वीचा 26/27) : चुंचाळे, दत्तनगर, भोर टाऊन शिप, संजयनगर, खालचे-वरचे चुंचाळे, मेदगेनगर, दत्तमंदिर.

-प्रभाग : 35 : (पूर्वीचा 27/29): अंबड एमआयडीसी, चुंचाळे, घरकुल, उत्तमनगर, मोरवाडी, अश्विननगर.

-प्रभाग : 36 : (पूर्वीचा 27/28) : अंबडगाव, महाजननगर, शुभम पार्क, कम्फर्ट झोन.

-प्रभाग: 37 (पूर्वीचा 29 ) : पवननगर, राजरत्ननगर.

-प्रभाग : 38 ( पूर्वीचा 29 ) : विजयनगर, पेलिकन पार्क, गणेश चौक

- Advertisment -

ताज्या बातम्या