Friday, April 26, 2024
Homeजळगावजिल्हा दूध संघात अखाद्य तूपाच्या विक्रीद्वारे 7 लाख 92 हजाराचा अपहार :...

जिल्हा दूध संघात अखाद्य तूपाच्या विक्रीद्वारे 7 लाख 92 हजाराचा अपहार : गुन्हा दाखल

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या(District Milk Producers Cooperative Union) विक्री विभागाने (sales department) अखाद्य (बी ग्रेड) तुपाची (Non-Edible (B Grade) Ghee) अनाधिकृतरित्या विक्री (Unauthorized sales) करून 7 लाख 92 हजारांचा अपहार (embezzlement) केल्याप्रकरणी चौकशी (inquiry) करून गुन्हा दाखल (Filed a case) करण्यासंदर्भात जिल्हा दुध संघाचे कार्यकारी आणि प्रभारी कार्यकारी संचालक (Executive and In-charge Executive Director) यांनी आज शहर पोलिसात (city police) तक्रार (complaint) दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानुसार निखिल सुरेश नेहते यांच्यासह त्यांचे कर्मचारी यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघावर प्रशासकीय मंडळ कार्यान्वीत झाल्यापासून अनेक गौडबंगाल बाहेर येत आहेत. संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी सुरू असुन आज नव्याने अखाद्य तुपाच्या अनाधिकृत विक्रिचा मुद्दा समोर आला आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा दुध संघावर दिनांक 15 सप्टेंबर 2015 ते 28 जूलै, 2022 पर्यंत संचालक मंडळ कार्यरत होते.

नंतरच्या काळात दिनांक 29 जूलै, 2022 अन्वये संघाचे संचालक मंडळ बरखास्त करुन 11 सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केलेली आहे. प्रशासकीय समिती सभा क्रमांक 3, विषय क्र. 17 अन्वये अखाद्य (बी-ग्रेड ) तूप मात्रा सुमारे 915 किलो अंदाजीत रक्कम रु.78 हजार रूपये विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.

त्यानुसार विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर यांनी सादर केली होती. याकामासाठी दिनांक 26 ऑगष्ट 2022 रोजी जाहिरात प्रसिध्द करुन खरेदीदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतू विक्री विभागाने असे सांगीतले की, संघाकडे साठा शिल्लक / उपलब्ध नाही व निखील सुरेश नेहेते व अन्य यांनी विनामंजूरीने अनधिकृतपणे मे. विठ्ठल रुखमिणी एजंन्सी, यांना एकूण 1800 किलो माल रक्कम रु. 1,53,000 इतक्या कमी किमतीत विक्री करुन अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

विक्रीला प्रशासकीय समितीने केली होती मनाई

प्रशासकीय समितीने अखाद्य (बी-ग्रेड) तूप विक्री करु नये असे निर्देश दिलेले असतांना तूप विक्री झाल्याने त्यामागे संघास नुकसान पोहचण्याचा हेतू होता की काय तसेच विक्री विभाग प्रमुख अनंत अंबीकर यांनी दिनांक 23 ऑगष्ट 2022 रोजी त्यांच्याकडे बी-ग्रेड तुपाचा साठा नसतांना सुध्दा प्रशासकीय समितीला 915 किलो बी-ग्रेड तूप विक्री करण्यासाठी टिपणी दिली. प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी वेळोवेळी बी-ग्रेड तुपाच्या नमून्याची मागणी केली असता ते उपलब्ध करुन दिले नाहीत.

ए ग्रेड तूप ज्याची किंमत रुपये 525.00 प्रती किलो असते ते बी ग्रेड तूप म्हणजेच रु. 85.00 प्रती किलो विक्री केली असून संस्थेचे रक्कम रु. 7.92 लाख आर्थीक नुकसान करून गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार कार्यकारी संचालक मनोज लिमये आणि प्रभारी कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी सोमवारी शहर पोलिसात दिली आहे. आता या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस काय कारवाई करतात? याकडे लक्ष लागून आहे.

त्यानुसार निखिल सुरेश नेहते रा. दादावाडी खोटे नगर यांच्यासह त्यांचे कर्मचारी यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.

गुन्हा दाखल झाल्याने राजकारणात खळबळ

जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या