Video...जेव्हा चिमुकली मुख्यमंत्र्यांकडे गुवाहाटीला नेण्याचा हट्ट करते; 'हा' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मुंबई । Mumbai

राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे पूर (Flood) परिस्थितीच्या दौऱ्यापासून ते अगदी दिल्ली दौऱ्यापर्यंत (Delhi tour) अनेक गोष्टींमुळे प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. त्यातही मुख्यमंत्री शिंदेंचे वारकऱ्यांना मदत करण्यापासून ते पूर परिस्थितीचा फोनवरुन आढावा घेण्याचे, चिमुकल्या समर्थकांशी फोनवर चर्चा करण्याचे व्हिडीओही चांगलेच व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एका चिमुकलीने मुख्यमंत्री शिंदेंकडे गुवाहाटीसंदर्भात एक अजब आश्वासन मागितले. तिची मागणी ऐकून मुख्यमंत्री नि:शब्द झाले तर सर्व उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचे पहायला मिळाले...

या व्हिडिओमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज आणि ट्रस्ट इंग्लिस मिडीयम स्कूल इथे शिकणाऱ्या अन्नदा डामरे (Annada Damre) या चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर (Nandanvan Bungalow) भेट घेतली. यावेळी या चिमुकलीने (child girl) माझ्या मोठ्या बाबांनी मला टीव्हीवर दाखवले, की करोना काळात आणि पूरपरिस्थितीत तुम्ही लोकांची खूप मदत केली. मी मोठे होऊन लोकांची मदत केली तर मला मुख्यमंत्री बनता येईल का, असा निरागस प्रश्न तिने मुख्यमंत्र्यांना विचारला. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी या चिमुकलीच्या खांद्यावर हात ठेवत, “होता येईल, होता येईल” असे म्हटले.

पुढे बोलतांना ही चिमुकली म्हणाली, 'एक सांगू का? आधी मला फक्त मोदीजी आवडायचे.पण धर्मवीर बघितल्यापासून तुम्ही पण आवडता. असे म्हटले. यानंतर तिने मुख्यमंत्र्यांना “तुम्ही आता रुद्रांक्षला वेळ कसा देणार?” या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी अगदी हातवारे करुन, “मी त्याला भेटायला ठाण्याला जाणार होतो. पण तोच मला भेटायला इकडे आलाय,” असे सांगितले.

त्यानंतर पुढे ही चिमुकली मुख्यमंत्र्यांना म्हणाली की, मला तुमच्याकडून एक वचन हवे आहे. येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेवून जाल का? असे तिने विचारले. यावर मुख्यमंत्र्यांनीही गुवाहाटीला तुला देवीच्या मंदिरात जायचे आहे ना? असा सवाल करत ही चिमुकली खूप हुशार असल्याचे म्हटले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com