माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ

माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ

मुंबई । Mumbai

काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अस्लम शेख (MLA Aslam Shaikh) यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने (Ministry of Environment) मढ मार्वे स्टुडिओ (madh marve studio) प्रकरणी नोटीस पाठवली असून याप्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे...

या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी एक ट्वीट केले असून यात म्हटले की, “अस्लम शेख यांनी १ हजार कोटी रुपयांचा मढ मार्वे स्टुडिओ घोटाळा (madh marve studio scam) केला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने अस्लम शेख व त्यांच्या मित्रांना नोटीस पाठवल्या आहेत. मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई महापालिकेला ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अस्लम शेख यांनी ४ ते ५ दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची सागर निवासस्थानी अत्यंत गुप्त पद्धतीने भेट घेतली होती. या भेटी मागचे नेमके कारणही स्पष्ट झाले नव्हते. तसेच याआधी किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते.

त्यामुळे या नेत्यांना तुरुंगात जावे लागले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख (MLA Anil Deshmukh) नवाब मलिक (Nawab Malik) आणि आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांचा समावेश आहे. त्यानंतर सोमय्यांच्या निशाण्यावर आता कॉंग्रेसचे अस्लम शेख आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com