Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याऐश्वर्या रायबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य गावितांना भोवणार? महिला आयोगाने बजावली नोटीस

ऐश्वर्या रायबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य गावितांना भोवणार? महिला आयोगाने बजावली नोटीस

मुंबई | Mumbai

राज्य मंत्रिमंडळातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री विजय कुमार गावित यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याचं रहस्य सांगणारा अजब दावा सोमवारी केला होता. त्यांच्या व्यक्तव्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यांनी केलेले हे व्यक्तव्य आता त्यांच्या अंगलट आले आहे. राज्य महिला आयोगाने मंत्री विजय कुमार गावित यांना अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या विधानाप्रकरणी विजयकुमार गावितांना नोटीस पाठवून तीन दिवसांत याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. रुपाली चाकणकरांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. “धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असताना मंत्री विजयकुमार गावित यांनी महिलांचा अवमान होईल असे वक्तव्य केले. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा, वर्तनाचा दीर्घ परिणाम समाजमनावर होत असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी समाजात वावरताना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने श्री. गावित यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राज्य महिला आयोगास तीन दिवसांत खुलासा सादर करावा,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

गावित नेमकं काय म्हणाले?

धुळ्यातील सभेत मासे खाण्याचे फायदे सांगताना गावित यांनी ऐश्वर्या रायच्या डोळ्यांचे उदाहरण दिलं होतं. तसेच मासे खाल्याने त्वचा चिकनी होत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. “तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रायबद्दल? ती बेंगलोरच्या समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे”, असं ते म्हणाले होते.

दरम्यान, ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या या विधानानंतर विजयकुमार गावित यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. “ऐश्वर्या राय माझ्या मुलीसारखी आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मासे खाण्याचे, म्हणजेच फिश ऑईलचे आरोग्यासाठीचे फायदे मी आदिवासी लोकांना समजावून सांगत होतो. आरोग्यासाठी मासे चांगले आहेत, हेच सांगण्याचाय यामागचा उद्देश होता,” असं गावित यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या